सातासमुद्रापार झेंडा रोवणाऱ्या शरीरसौष्ठव पट्टुवर होत आहे अन्याय
भारतासाठी शरिरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक, रजतपदक,कस्यपदक, विजेता लिलाधर म्हात्रे आहेत मदतीच्या प्रतिक्षेत
✍️ संतोष उध्दरकर ✍️
म्हसळा तालुका प्रतिनीधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा:नागोठणे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वरवठणे येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले लिलाधर म्हात्रे हे लहानपणापासून ध्येयवादी, अनेक खेळांमध्ये चमक दाखवीत असताना क्रिकेट, पोहणे, धावणे अशा एक ना अनेक कसरत करत असताना ते एका वेगळ्याच खेळाकडे वळले ते म्हणजे शरीर सौष्ठव, शरीराला व्यायामाची जोड त्यांनी लावून घेतली आणि ते १९९६ पासून या क्षेत्रात उतरले, १९९९ ला मानाची जिल्ह्याची “रायगड श्री” ही स्पर्धा ३ वेळा जिंकून रायगडचे व विभागाचे नाव रोषन केले, म्हात्रे यांनी अनेक नव तरूण खेळाडूंना स्पर्धेची ओळख करून देताना अनेकांना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यसनापासून दूर रहा तरच या खेळात टिकून रहाल असा कानमंत्र दिला. जानेवारी २०१५ मध्ये वयाच्या ३८ व्या वर्षी उज्जैन (मध्य प्रदेश) येथे झालेल्या स्पर्धेत “पश्चिम भारत श्री” हा किताब जिंकून मोठ्या स्पर्धेचे ध्येय पार करीत असताना २०१६ मध्ये मुंबईमध्ये “अंधेरी श्री” या स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात रजत पदक, एप्रिल २०१६ मध्ये नोएडा, बुलंद शहर (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या “भारत श्री” या स्पर्धेत रजत पदक पटकावले तद्नंतर २०१७ मध्ये “पनवेल श्री” या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकतर्फी विजयश्री खेचून आणली होती तेव्हा या रायगड जिल्ह्यात तोडीचा एकही स्पर्धक नव्हता. २०१९ मध्ये झालेली “मुंबई श्री” स्पर्धा देखील एकाकी गाजवून सूवर्णपदक जिंकले. एवढं होत असताना रायगड जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था, मोठमोठे राजकीय नेते मंडळी असताना पण त्यांच्या नाकर्तेपणामुळे या खेळाडूकडे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे, आर्थिक कोंडी झाल्यामुळे मधली पाच वर्ष केवळ व्यायाम सुरू ठेवावा लागला. यानंतर २०२३ पासून पुन्हा या खेळाकडे पूनरागमन केल्यानंतर मुंबई व रायगड जिल्ह्यातील अनेक दिग्गज खेळाडू व पंच यांच्या भूवया उंचावल्या व वयाच्या ४७ व्या (चालू वर्षात) अनेक स्पर्धेत द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावून प्रेक्षकांची मने जिंकली. अशा या होतकरू शरीर सौष्ठव पट्टूने जिल्ह्याचा, तालुक्याचा नव्हे तर नागोठणे विभागाचा झेंडा सतत फडकवत ठेवला आहे, मात्र हा खेळ मेहनतीचा तर आहेच पण तितकाच खर्चिक देखील असल्याने सर्व गोष्टींची जुळवाजुळव करताना तारेवरची कसरत करावी लागते असे लिलाधर म्हात्रे यांनी आमच्या प्रतिनिधी यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.
……………………………………
मी आजपर्यंत भारतासाठी तसेच रायगड साठी शारिर सौष्ठव स्पर्धेत भाग घेऊन अनेक वेळा सुवर्णपदक, रजतपदक. कास्यपदक विजयी प्राप्त केले आहेत. आणि रायगडचे नाव मोठे केले आहे यासाठी राज्य सरकारने व स्थानिक राजकीय नेते व सामाजिक संस्था यांनी माझी दखल घ्यावी व मला आर्थिक सहकार्य करावे. मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या भारताचे नाव मोठे करायचे आहे.
लिलाधर म्हात्रे
शरिरसौष्ठव पट्टु, नागोठणे.