क्रिकेटचा महासंग्राम,शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आयोजित युनिटी चषक (सिपीएल) पर्व ३रे.

क्रिकेटचा महासंग्राम,शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आयोजित युनिटी चषक (सिपीएल) पर्व ३रे.

क्रिकेटचा महासंग्राम,शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आयोजित युनिटी चषक (सिपीएल) पर्व ३रे.

क्रिकेटचा महासंग्राम,शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आयोजित युनिटी चषक (सिपीएल) पर्व ३रे.

✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞8983248048📞

माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वसलेले निसर्गरम्य गाव चांदोरे येथे युनिटी (सिपिएल)चषक पर्व ३रे. संपन्न.

शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे ग्रामस्थ व मुंबई मंडळ चांदोरे यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे अगदी उत्तम प्रकारे आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाडवून ग्राउंडचे उदघाटन करण्यात आले, याक्षणी काही प्रतिष्ठित मान्यवर, उपस्थित क्रिकेट प्रेमी, चांदोरे कुणबी आळी येथील सर्व ग्रामस्थ, मुंबई मंडळ तसेच पंचक्रोशीतील तमाम नागरिक ग्राउंडवर उपस्थित होते.
पारितोषिके सौजन्य:-
१)प्रथम क्रमांक १०.००० रू. व आकर्षक चषक कै. दिनकर नथुराम इंदुलकर यांच्या स्मरणार्थ विजय राजाराम इंदुलकर यांस कडून.
२) द्वितीय क्रमांक ७,०००रू. व आकर्षक चषक कै. तुकाराम भागोजी खांबे यांच्या स्मरणार्थ निलेश खांबे,केतन खांबे,नितेश खांबे यांस कडून.
३) लेजेंड संघ प्रथम पारितोषिक ३,५०० रू. व आकर्षक चषक कै. दिनकर इंदुलकर यांच्या स्मरणार्थ विजय इंदुलकर यांस कडून.
४) लेजेंड संघ द्वितीय पारितोषिक आकर्षक चषक कै. दिनकर नथुराम इंदुलकर यांच्या स्मरणार्थ विजय राजाराम इंदुलकर यांस कडून.

उत्कृष्ठ फलंदाज आकर्षक चषक राहिल मयूर शिंदे यांस कडून, उत्कृष्ठ गोलंदाज आकर्षक चषक पूर्वा वि. लोखंडे यांस कडून, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण आकर्षक चषक ऋतुजा अ.लोखंडे यांस कडून.मालिकावीर आकर्षक चषक रुद्र विं. लोखंडे व 7t7t टीशर्ट अंकेश पवार यांस कडून, मालिकावीर आकर्षक चषक लेजेंड संघ. दुर्वा अ. लोखंडे यांस कडून
तसेच विजेता व उपविजेता संघातील खेळाडूंना मेडल मंडळातर्फे अर्पण करण्यात आले, सामनावीर चषक स्वरूप रू, चाचले यांस कडून तसेच सर्व संघ मालकांना कै.दिनकर इंदुलकर यांच्या स्मरणार्थ दिनेश लोखंडे यांस कडून सन्मान चिन्हं देण्यात आले. सकाळी १० वाजल्या पासुन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सामने चालू होते. उन्हाची पर्वा न करता सर्वच क्रिकेट प्रेमी अगदी आनंदाच्या वातावरणात क्रिकेटचा महासंग्राम पाहत होते अगदी आनंदाच्या वातावरणात हा क्रिकेटचा महासंग्राम पार पडला.

दुसऱ्या दिवशी शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे आयोजित, माणगाव पंचायत समिती माजी सभापती यांच्या प्रयत्नाने तसेच मा.आमदार भरतशेठ गोगावले यांच्या सौजन्याने आमदार चषक २०२४ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, त्याक्षणी माणगाव तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमी,चांदोरे कुणबी आळीतील सर्व समाज बांधव व मुंबई मंडळाचे सर्व सभासद बंधु व पंचक्रोशीतील काही नागरिक व सर्व क्रिकेट प्रेमी बहु संख्येने उपस्थित होते.