अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री करणाऱ्यास अटक
• राजुर्यात 65 हजार 280 रूपयांची बियाणे जप्त
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 20 मे
थेट आंध्र प्रदेशातून बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची आयात केली. त्या बियाण्यांची विक्री करू पाहणार्यांना कृषी विभागाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडून 65 हजार 280 रूपयाचे बियाणे जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवार, 20 मे रोजी राजुरा
तालुक्यातील धानोरा येथे करण्यात आली. राजुरा तालुक्यातील धानोरा येथे एका कच्चा घरात बोगस कापूस बियाण्यांची साठवणूक करून ठेवण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. माहितीच्या
आधारे धाड टाकून तपासणी केली असता, 34 किलो अनधिकृत कापूस बियाणे आढळून आले. त्याची किंमत 65 हजार 280 रूपये इतकी आहे. यापूर्वी पोंभूर्णा तालुक्यातील नवेगार मोरे व भिमणी येथे धाड टाकून लाखो रूपयांचे अनधिकृत बोगस कापूस बियाणे जप्त करण्यात
आले. सिमेलगतच्या राज्यातून बोगस बियाण्यांची आयात होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकार्यांनी दिली. खरीप हंगामाला तोंडावर आला आहे. या पृष्ठभूमीवर शेतकरी सज्ज झाला असून, शेतकर्यांना माथी बोगस बिटी बियाणे मारण्याचे षडयंत्र रचले जात आहे. शेतकर्यांची
बियाण्यांमध्ये फसगत होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. शेतकर्यांनी बियाणे, रासायनिक खते, व कीटनाशक खरेदी करताना काळजी घ्यावी. बनावट व भेसळ आढळल्यास तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे..ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा.कृषी अधीक्षक शंकरराव तोटावार, कृषी
विकास अधिकारी वीरेंद्र रजपूत यांच्या.मार्गदर्शनात तंत्र अधिकारी तथा गुण नियंत्रक चंद्रशेखर कोल्हे, मोहिम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुण नियंत्रक श्रावण बोढे,
तालुका कृषी अधिकारी व्ही. बी. पायघन, कृषी अधिकारी नरेश ताजणे व पोलिस विभागाने केली.