वेकोलीच्या पवनी कोळसा खाणीतील रासायनिक द्रव्यांमुळे तलावातील शेकडो मासोळ्यांचा मृत्यू!
• राजेश बेले यांची कारवाईची मागणी
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 22 मे
पवनी वेस्टर्न कोलफिल्ड डब्लुसीएलच्या बल्लारपूर कोळसा खाणीमुळे निघणाऱ्या घातक रासायनिक द्रव्यांमुळे साखरी गाव तलावातील हजारो मासोळ्या मृत पावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे साखरी गावातील मानवी जीवनावरही धोका निर्माण झाला आहे.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सोमवार, २० मे रोजी, डब्लुसीएलच्या बल्लारपूर कोळसा खाणीतून निघणारे घातक रासायनिक द्रव्य साखरी गाव तलावात मिसळले. यामुळे तलावातील हजारो मासोळ्या मृतत पावल्या. दूषित पाण्यामुळे हवेत घातक गॅस पसरल्याने साखरी गावातील लोकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, डब्लूसिएलमुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जमिनीवरील नुकसानीमुळे गावातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
राजेश बेले यांनी याविरोधात अनेक आरोप केले आहेत. कोळसा हाताळणी करताना डब्लूसिएलद्वारे वायू प्रदूषण केले जात आहे. घातक रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडून पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करत आहे. कोळसा खाणीतील धुळीमुळे वायू प्रदूषण होत आहे. जडवाहतुकीमुळेही वायू प्रदूषण होत आहे.
डब्लूसिएलच्या बल्लारपूर कोळसा खाणीची पर्यावरण परवानगी रद्द करून, डब्लूसिएलच्या मुख्य प्रबंधक आणि उपमुख्य प्रबंधकांवर पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा. झालेल्या नुकसानीसाठी पीडित गावांना योग्य नुकसान भरपाई देणे, आदी मागण्या राजेश बेले यांनी केल्या आहेत.