सत्यनारायण हा पोटापाण्याचा धंदा !
✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞
लेख :-
१३ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. साडेतीन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये आमच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये आम्ही राहायला आलो . पण दोन्ही वेळेस मी सत्यनारायण घातला नाही . भविष्यातही घालणार नाही .
१८५० पूर्वी भारतात सत्यनारायण घातल्याचे कोणतेही पुरावे मिळत नाहीत. विशेष छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे किल्ले जिंकले किंवा बांधले. धार्मिक कार्य केले, दानधर्म केले परंतु एकदाही कोणत्याही गडावर सत्यनारायण घातला नाही. पेशवे एवढे वेगवेगळे धार्मिक विधी करायचे, ब्राह्मणांना कोट्यवधी रुपयांचे दान करायचे. पण त्यांनीही सत्यनारायण घातल्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही.
सत्यानारायण घालणे हे अगदी अलीकडंच बहूजन समाजाच्या डोक्यात घातले गेलेले खूळ आहे .
आपल्या देशात दरवर्षी कमी-जास्त एक कोटी लग्न होतात . लाखो फ्लॅट, घर, दुकानं बांधली व विकत घेतली जातात. त्यानिमित्त सत्यनारायण पूजा घातली जाते. आता तर एक नवीनच खूळ लोकांच्या डोक्यात घातले आहे, ते म्हणजे प्रजासत्ताक दिन, गणपती आणि कधीही आधामधी सत्यनारायण घालण्याची परंपरा सुरु झाली आहे. थोडक्यात, दरवर्षी साधारणतः एक कोटीच्या आसपास सत्यनारायण पुरोहितांच्या (ब्राह्मण) हस्ते केले जातात . एका सत्यनारायणाची सरासरी १०००/- रुपये जरी दक्षिणा धरली तरी भारतात १००० कोटी रुपयांचा सत्यनारायणाचा व्यवसाय आहे व हा व्यवसाय करणारे फक्त काही लाख पुरोहित आहेत आणि ९९.९% पुरोहित हे एका जातीचे आहेत . म्हणजे एकाच विधीमधून यांना किमान १००० कोटी रुपये मिळतात .
मी स्वतः एक-दोनदा हा विधी करताना मुद्दामहून थांबलेलो आहे. त्यात हा विधी केला नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते अशी भितीच दाखविली अशी भीती दाखवून लोकांना हा विधी करायला भाग पाडले जाते. लोकांनी या भीतीमधून बाहेर पडायला हवे . आपली भीती, अज्ञान, दैववादीपणा हेच यांचे भांडवल आहे.
महत्वाचे म्हणजे सत्य नारायणाचा व बहुजनांचा काहीही संबंध नाही. तसेच त्यांनी सत्यनारायण घातला नाही म्हणून हिंदू धर्म बुडून जाईल, असेही काही नाही.
*सत्यनारायण घालणे फक्त पुरोहितांचा (ब्राह्मणाचा) पोट भरण्याचा धंदा आहे .*
निरंतर आपलाच
मा. चंद्रकांत फडतरे,
संस्थापक अध्यक्ष –
शिवराय फुशांबु ब्रिगेड.
संपर्क क्रमांक 9869696290