महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुनव्रिलोकन समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनयजी सहस्रबुधे यांनी घेतली भेट
सुधीर मुंनगथीवार यांची
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो.7498051230
चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण पुनर्विलोकन समितीचे कार्याध्यक्ष डॉ विनयजी सहस्रबुद्धे यांनी आज माझी शासकीय निवासस्थानी भेट घेऊन समितीचा अंतिम अहवाल सादर केला. या प्रसंगी समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री गिरीशजी प्रभुणे, श्री सुहासजी बहुळकर, श्री दीपकजी करंजीकर, श्री सोनूदादा म्हसे, श्री जगन्नाथजी हिलीम यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालक श्री बिभीषणजी चवरे उपस्थित होते.
या समितीने गेले वर्षभर अत्यंत मेहनतीने राज्यातील विविध भागांना भेटी दिल्या. समाजातील विविध घटकांसोबत बैठकीच्या माध्यमातून संवाद साधत हा सर्वंकष व सर्वसमावेषक अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या आधाराने राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र अधिक समृद्ध करणाऱ्या नवीन सांस्कृतिक धोरणाचा मसुदा लवकरच राज्य मंत्रीमंडळासमोर सादर केला जाईल.