नकोडा येथे सामान्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन
🖋️साहिल सैय्यद…….
घुग्घुस तालुका प्रतिनिधि
📲 9307948197
घुग्घुस : येथून जवळच असलेल्या नकोडा ग्रामपंचायत येथे रविवार, २६ मे रोजी एसीसी, अदानी फाउंडेशन आणि चांदा सिमेंट वर्कतर्फे सामान्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन एसीसी कंपनीचे प्लांट हेड कृष्ण मोहन यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, प्लांट हेड कृष्ण मोहन, सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, हेड एचआर प्रफुल पाटील, सदस्य प्रभाकर लिंगमपेल्ली, तनुश्री बांदूरकर, ममता मोरे, चंदू ताला, सोनू सिंग, भाजपाचे बाळकृष्ण झाडे, वैशाली गुळघाने, शुभांगी नगराळे, गणेश डोर्लीकर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केली. १०२ रुग्णांची तपासणी करून मोफत औषध वितरण करण्यात आले. दर रविवारी सामान्य आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.
यावेळी नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते.