नांदेड 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या.

59

नांदेड 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या.

नांदेड :- जिल्ह्यात चिड आणणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार  करुन तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

याप्रकरणी आरोपी बाबू संगेवार याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी बाबू हा सालगडी म्हणून गावात काम करत होता. शेतमालकाच्या मुलीवरच त्याने बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. या अमानुष घटनेमुळे भोकर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.