अन्…. चंद्रपूरकरांनी अनुभवला रस्त्यावर पेटत्या वाहनाचा थरार 🚛🛻 • तणसीने भरलेल्या धावत्या मालवाहू वाहनाला आग • वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळल

अन्.... चंद्रपूरकरांनी अनुभवला रस्त्यावर पेटत्या वाहनाचा थरार 🚛🛻 • तणसीने भरलेल्या धावत्या मालवाहू वाहनाला आग • वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळल

अन्…. चंद्रपूरकरांनी अनुभवला रस्त्यावर पेटत्या वाहनाचा थरार 🚛🛻

• तणसीने भरलेल्या धावत्या मालवाहू वाहनाला आग
• वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळल

अन्.... चंद्रपूरकरांनी अनुभवला रस्त्यावर पेटत्या वाहनाचा थरार 🚛🛻 • तणसीने भरलेल्या धावत्या मालवाहू वाहनाला आग • वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळल

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 27 मे
मूलवरून तणीस भरून दाताळाकडे जात असलेल्या एका मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतला. यावेळी चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाने ही बाब वाहनचालकाच्या वेळीच लक्षात आणून दिल्याने पुढील मोठा अनर्थ ठरला. ही घटना येथील सावरकर चौकातील रामनगर पोलिस ठाण्यासमोर सोमवार, 27 मे रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.
मालवाहू चारचाकी वाहन (एमएच33 जी 1520) हे मूलवरून जनावरासाठी तणीस भरून सोमवारी दूपारच्या सुमारास दाताळाकडे निघाले. यावेळी मार्गात या ट्रकला अचानक आग लागून तणीसीने पेट घेतला. मात्र, ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. वाहन येथील सावरकर चौकातील रामनगर पोलिस ठाण्यासमोर पोहचल्यानंतर तेथे चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहनाला आग लागल्याचे दिसले. त्यांनी लगेच धावत जाऊन ही बाब वाहनचालकाच्या लक्षात आणून दिली. चालक वाहन थांबवून खाली उतरला. सुरूवातील पोलिसांनी रामनगर पोलिस ठाण्यातून पाईपने पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. पालिकेचे दोन अग्निशमन वाहन व ट्रॅक्टर घटनास्थळी पोहचल्यानंतर पाण्याचा मारा करून आग विझविण्यात आली. नेमक्या त्याचवेळी आकाश दाटून आले आणि पाऊसही कोसळला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने वाहनातील जळालेले तणीस काढण्यात आले. यावेळी या मार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता विस्कळीत झाली होती.