न्यू इंग्लिश स्कूल नेवरुळ १० वी चा निकाल १०० टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कुल चेअरमन रविंद्र लाड यांनी केले अभिनंदन
✍️ संतोष उद्धरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: म्हसळा तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कूल नेवरुळ १० वी चा निकाल १०० टक्के निकाल लागल्याने शाळेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, याही वर्षी न्यु इंग्लिश स्कूल नेवरूळ स्कूलने १०० टक्के निकाल लागण्याची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे . यावेळी १० वी च्या परिक्षेत प्रथम क्रमांक १ ) श्रावणी कापडी ८१.२० टक्के
२ ) व्दीतीय क्रमांक शुभेच्छा आग्रे ८०.२० टक्के,३ ) त्रितीय क्रमांक वैष्णवी मांडवकर ७६ टक्के. तर प्रचिती खोपरे ७४.८० टक्के चतुर्थ क्रमांक व अक्षत पवार याला ७०.२० टक्के गुण मिळवुन पाचवा क्रमांक मिळविण्यात यश मिळाल्याने या मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन १०० टक्के निकाल लागला असल्याने यशस्वी विद्यार्थ्याच्या चेहर्यावर आनंद दिसत असल्याने पालकांनी देखील समाधान व्यक्त केले.यावेळी देखील मुलीच सरस असल्पाचे दिसुन येत आहे, सर्व यशस्वी विद्याथ्यांचे न्यू इंग्लिश स्कुल चे अध्यक्ष रविंद्र लाड व मुख्याध्यापक मिणेकर सर यांनी गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थी सरस ठरले असुन सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.