कुख्यात मोटर सायकल चोर सिंदेवाही पोलिसांच्या ताब्या
प्रतिनिधि/अमान क़ुरैशी
827553131
सिंदेवाही :- सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व मोटार सायकल चोरीच्या घटना उघडकीस
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या सूचनेच्या अनुषंगाने सिंदेवाही पोलीस ठाणे येथे पथक तयार करून आरोपींचा शोध घेत असताना PSI महल्ले याना गोपनीय माहिती मिळाली कि, सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे याने त्याचा साथीदार आकाश खुशाल सिडाम रा वडसा याच्या साथीने चोरी केल्याचे माहितीवरून आकाश खुशाल सिडाम वय 29 यास वडसा येथून ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबतीत माहिती घेतली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याने सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे रा राजुरा याच्या साथीने सिंदेवाही येथे 03 गुन्हे केले असून सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी आकाश खुशाल सिडाम, वय 29 वर्ष, रा. आंबेडकर वार्ड देसाईगंड वडसा जि. गडचिरोली याला अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन 1) एम.एच./34/बी.एक्स./9439 किमंत 40000 रु, 2) एम.एच./34/बी.क्यु./9513 किमंत 35000 व 3) एक लिनेवो कंपनिचा लँपटाँप किमंत 20000 रु याप्रमाणे दोन मोटर सायकल व एक लँपटाप असा एकुण 95000 रु जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाणे सिन्देवाही येथील अधिकारी व अंमलदार यांनी परीश्रम घेवुन नमुद प्रमाणे आरोपीतांकडुन एकुण दोन मोटार सायकल व एक लँपटाँप जप्त केले आहे. वरील गुन्यातील आरोपी सचिन उर्फ बादशहा संतोष नगराळे रा राजुरा हा जेल मध्ये असून त्याचा ताबा घेऊन सिंदेवाही पोलीस ठाणे येथील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे
सदर गुन्हयाचा तपास मा. श्री मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक सा. चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधीक्षक सा. चंद्रपुर, मा. श्री दिनकर ठोसरे, अपविभागीय पोलीस अधिकारी सा. ब्रम्हपुरी व ठाणेदार तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर महल्ले व पोहवा मधुकर आत्राम, पोहवा गणेश मेश्राम हे करीत आहेत.