सुधाकर नारायण शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल माणगांव एस. एस. सी .बोर्डाचा 100% निकाल
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड : एस एस सी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. असून माणगांव तालुक्यातील माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे एस. एन शिपूरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूलचा दहावी बोर्डाचा निकाल 100% लागला आहे.दहावीच्या परीक्षेत माणगांव येथील शिपूरकर स्कूल व गणेश वाघरे स्कूलने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.नर्सरी ते दहावी पर्यंत शिक्षण चालू असलेली शिपूरकर स्कूल व गणेश वाघरे शाळेला यंदाच्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 43 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये सर्वच विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले यामुळे संपूर्ण शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये टॉपर सुमित पांडे 93.20 %, प्रथम क्रमांक, अभय पार्टे 92%,नहुश भोनकर 92%, दिव्या दिवेकर 92.80%जानवी पवार 91.60%,आर्या दंताले 90.20%,आदित्य खडतर 89.80 %,राशीं मोदी 89.40.%,निवृत्ती पाटील 88.80%,तनुश्री माळी 88.80%,ख़ुशी पास्टे 88.60% तर सार्थक जांभरे 88.20%अशी चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. शाळेचे संस्थापक अध्यक्ष अँड राजिव साबळे तसेच मुख्याध्यापिका सौ. मनीषा मोरे मॅडम,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांस कडून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.