इंग्लिश स्कूल बामणोली ता. माणगांव शाळेचा निकाल 96.66% समस्त पंचक्रोशीतून कौतुकांस्पद अभिनंदन…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-महाराष्ट्र राज्य एस एस सी बोर्डाचा 2024 निकाल जाहीर झाला असून माणगांव तालुक्यातील इंग्लिश स्कूल बामणोली शाळेचा निकाल 96.66 टक्के लागला असून शाळेने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण चालू असलेली इंग्लिश स्कूल बामणोली शाळेचा यंदाचा दहावी चा परीक्षेसाठी एकूण 30 विदयार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामुळे संपूर्ण शाळेचा निकाल 96.66 टक्के इतका लागला असून यामध्ये गुणानुक्रमे प्रथम पाच क्रमाकाचे मानकरी पुढील प्रमाणे.प्रथम क्रमांक कु. आदित्य प्रशांत खिलार यांनी 83.60 %, द्वितीय क्रमांक कुमारी उर्मिला श्रीराम शेलार हिने 83.40% तर तृतीय क्रमांक कुमारी प्रतीक्षा सुनिल वाढवलं हिने 79.40%, चतुर्थ क्रमांक कु. आर्यन महादेव खाडे याने 77.80 %तर पाचवा क्रमांक कुमारी दिव्या दिनेश म्हसकर हिने 77.60% अशा चांगल्या पद्धतीने लागला असून इंग्लिश स्कूल बामणोली ता. माणगांव जि रायगड चे मुख्याध्यापक जगदाळे सर, खिडबीडेसर, कदमसर, वाळगुडेसर, पाटील सर, शेवाले सर, पवार मॅडम, कांबळे मॅडम त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन पालक वर्ग सरपंच, उपसरपंच यांच्याकडून सर्व विद्यार्थी वर्गाचे कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले. वास्तविक पाहता व्हेकेशन क्लास किंवा रेगुलर क्लास ची सुविधा नसताना सुद्धा बामणोली विभागातील मुलांनी उज्वल यशाची भरारी निश्चित केली आहे.