नांदाफाटा परिसरात विजेचा लपंडाव सुरूच, महावितरणविरोधात नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

नांदाफाटा : 30 मे
गेल्या दहा दिवसांपासून नांदाफाटा परिसरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. दिवसा तसेच रात्री मोठ्या प्रमाणात वीज जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात नागरिकांकडून बुधवारी आंदोलनाचा इशारा महावितरणाच्या अभियंत्याला निवेदन देऊन देण्यात आला. सतत जाणारी वीज तात्काळ थांबवावी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, या बाबतची मागणी चर्चा करून करण्यात आली. येत्या चार दिवसांत सदर विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन यावेळी अभियंत्यांनी दिले. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश बोरकर, नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, माजी सदस्य चंदू राऊत, बंडू गायकवाड, राकेश खेवले आदी उपस्थित होते.