मटकाझरी तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू.
त्रिशा राऊत नागपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953
उमरेड .उमरेड तालुक्यातील कुही पोलीस स्टेशन हद्दीतील मटकाझरी गावातील मटकाझरी तलावात तीन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मृत हे एकाच कुटुंबातील असून ते पाचगाव सुरगाव येथील त्यांच्या शेतात डब्बा पार्टी करण्यासाठी आले होते.
यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर जितेंद्र आणि संतोष हे नेहमी मटकाझरी तलावात आंघोळ करायला उतरले. जितेंद्र शेंडे, संतोष बावणे व निषेध राजू पोपट हे तिघेही खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले. मात्र नजित हा लहानगा पाण्यात बुडायला लागला. त्यानंतर जितेंद्र व संतोष यांचाही बुडून मृत्यू झाला
माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मदतीने तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. या आधी पण उमरेड तालुक्यातील कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मटकाझरी तलावात एकाच कुटुंबातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता.