लोणी ते नारंडा रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण
भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या अथक प्रयत्नांना यश
मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मो,9923358970
कोरपना :- कोरपणा तालुक्यातील लोणी ते नारंडा प्रमुख जिल्हा मार्ग ४७ रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झालेले असून याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार संजय धोटे यांच्या पुढाकारातून जिल्हा खनिज विकास निधी सन २०१८-१९ अंतर्गत मंजूर झालेला होता सदर रस्ता हा ३.२० कोटी रुपये निधी खर्च करून पूर्ण करण्यात आलेला आहे.याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी अथक प्रयत्न केले असून रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे.
सदर रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे लोणी व नारंडा शेतशिवारातील शेतकऱ्यांना शेतात दळणवळण करणे सोयीचे होणार आहे तसेच सदर रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे कोरपना तालुक्यातील कोडशी खुर्द,हेटी,शेरज बु,शेरज खुर्द, पिपरी,लोणी इत्यादी गावातील नागरिकांना भोयगाव मार्ग चंद्रपूर जाणे जवळचे होणार आहे.
लोणी ते नारंडा रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रस्त्याचे काम मंजूर केल्याबद्दल भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजणे यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अँड. संजय धोटे यांचे आभार व्यक्त केले आहे.