जिल्हा भूमीअधिक्षक यांची तळेकरांनी भेट घेऊन कार्यालयीन कामकाज सुस्थीतीत करण्याची केली मागणी.

जिल्हा भूमीअधिक्षक यांची तळेकरांनी भेट घेऊन कार्यालयीन कामकाज सुस्थीतीत करण्याची केली मागणी.

जिल्हा भूमीअधिक्षक यांची तळेकरांनी भेट घेऊन कार्यालयीन कामकाज सुस्थीतीत करण्याची केली मागणी.

किशोर पितळे-तळा तालुका प्रतिनीधी ९०२८५५८५२९

तळा :- तळा-भूमी अभिलेख खाते महसुली विभागातील अत्यंत महत्वाचे खाते आहे.तळा भूमी अभिलेख कार्यालय हे जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक कार्यालयांनी वाऱ्यावर सोडलेले खाते आहे अशीच परिस्थीती निर्माण झाली आहे.डोंगराळ दुर्गम तालुकाअसून या कार्यालयाशी ६०/६५गावाचा संबंध येतो रिक्त पदांमुळे कामे वेळेवर होत नाहीत हि मोठी समस्या आहे.त्यामुळे एका कामासाठी खेटे मारावे लागत आहेत. तरी देखील कामे केली जात नाहीत.या बाबतअनेकवेळा वृत्तपत्रांचे माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.मात्र जिल्हा भुमी अधिक्षकांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे आज मात्र अचानक कार्यालयीन भेटी साठी आले असता जागृतशेतकऱ्यांनी पत्रकारांना माहीती दिली.कार्यालयीन कामाचाच पाढाच समोर वाचला.गेले कित्येक वर्षे पुर्ण पदे भरलेली नाहीत सद्या पाच जण कार्यरत आहेत. जवळ पास आठ-दहा पदे रिक्त आहेत.कमी स्टाफ असल्याने कामे होत नाहीत, मोजणीची फी भरून वेळेवर मोजणी होत नाही,जादा फीची मागणी केली जाते,एकदा मोजणीची तारीख निघून गेली का पुन्हा मोजणीची फीभरायला अधिकारी भाग पाडतात. एक मोजणीचे दोन वेळा फी भरून शेतकऱ्यांची लुटमार करीत आहेत. अशीलाच्या अर्जावर वेळीच निर्णय घेत नाहीत किंवा योग्यमाहितीसांगीतली जात नाही.प्रत्येक वेळेला वेगवेगळी कागद पत्राची मागणी केली जात आहे. बेकायदेशीर परस्पर वारस नोंद करणे,. गटनं.सर्वे नं.बदल्याची नोंद नसणे. नकाशा प्राप्त नसणे,आवक जावक वेळेवर न करणे,कार्यालय सुस्थीतीत न ठेवणे, निमतानदाराकडे लॅप्टाॅप नसणे,सहा-सहा महीने दस्त ऐवज टेबलावर पडुन असणे, वेळेवर न सापडणे, अधिकारी कर्मचारी कोणीच वेळेवर ऑफिस ला येत नाहीत अशा एक ना अनेक प्रश्राची मा. जिल्हा भूमी अधिक्षक सचीन इंगळी यांच्याकडे पत्रकार किशोर पितळे,श्रीकांत नांदगांवकर शिवसेना शहर प्रमुख राकेश वडके तालुका अध्यक्ष प्रद्धुम्न ठसाळ कोअर कमीटी सदस्य लिलाधर खातू, गिरणे उपसरपंच नागेश लोखंडे, सामाजीक कार्यकर्तै समीर तळकर यांनी चांगलेच धारेवर धरले.यांनी विचारलेल्या प्रश्रांना किंवा समस्यांना उत्तरे देण्यात किंवा गंभीरपणे विचार केला जाईल असे साधे उत्तर देण्यास अ समर्थ ठरले.अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनामा.जिल्हाधिकारी,मा.विभागीय आयुक्तभुमीअधीक्षक कोकण भुवन, महसुल मंत्री पालकमंत्री यांनी जे अधीकारी कर्मचारी कामचुकार करीत आहेत त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.