नवरगांव आलेसुर येथील प्रवासी निवाऱ्याची दूरवस्था परिवहन विभागाचे व प्रशासनाचे या कड़े दुर्लक्ष

नवरगांव आलेसुर येथील प्रवासी निवाऱ्याची दूरवस्था

परिवहन विभागाचे व प्रशासनाचे या कड़े दुर्लक्ष

नवरगांव आलेसुर येथील प्रवासी निवाऱ्याची दूरवस्था परिवहन विभागाचे व प्रशासनाचे या कड़े दुर्लक्ष

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील नवरगाँव चिमुर मार्गावरील आलेसुर या गावातील प्रवासी निवारा जीर्ण अवस्थेत असून स्थानिक प्रशासनाचे याकड़े पुरेपुर दुर्लक्ष होत आहे
हा प्रवासी निवारा जंगलाला लागला असून नेहमी या परिसरात वन्यप्राण्याचा वावर असतो जसे की वाघ,बिबट अश्वल, डूक्कर,वन्य प्राणी आढळून येतात
या गावातील विद्यार्थ्यांना सिंदेवाही नवरगांव चिमुर येथे शिक्षणासाठी महामंडळच्या बस ने जावे लागते तसेच गांवकर्याना बाहेर गावी जाण्यासाठी येथील प्रवासी निवारया खाली आश्रय घ्या लागतें परतु प्रवाची निवारयाला भगदाड पडले आहे सिमेंटचे टपरे पन निघाले आहे
यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांना बचाव करता येत नाही. अनेक वेळा मागणी करुनही प्रवासी निवारा झाला नाही.
याकडे परिवहन विभागाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

अनेक वर्षांपूर्वी बांधलेला राज्य परिवहन महामंडळाचा प्रवासी निवारा आहे. प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली असून भिंतीला भगदाड तसेच सीमेंटचे छपरे फाटलेली असून ऊन, वारा, आणि पावसापासून प्रवाशांचे सरंक्षण होऊ शकत नाही. उलट वाघ,बिबट,डूक्कर आणि अस्वल अश्या वण्यप्राण्याचा मुक्त संचार येथे असतो. प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते. अनेक वेळा नागरिकांनी मागणी करूनही येथे प्रवासी निवाऱ्याचे नूतनीकरण झाले नाही किंवा स्थानिक विकास निधीतून लोकप्रतिनिधीने येथे प्रवासी निवारा बांधला नाही.
पावसाळा, उन्हाळा व हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवाशांना बाहेर उघड्यावर बसेसची वाट बघावी लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, याकडे
लोकप्रतिनिधींनी व स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.