शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांच्या सोई-सुविधांसाठी काटेकोरपणे नियोजन विविध कार्यक्रमांचे आयोजन
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड दि. ५ :- शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन दुर्गराज रायगड येथे ५ व ६ जून रोजी होत असून रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली असून सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन केले असून गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विविध शासकिय विभागांना दिले आहेत.यंदा रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था प्रशासनाने केली आहे. सोहळ्यानिमित्त रायगडावर रोषणाई करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाशी समन्वय ठेवण्यात आला आहे. सोहळ्याच्या दिवशी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाड या दरम्यान सुरू करण्यात आली आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या सोहळ्यानिमित्त जिल्हा प्रशासनसह विविध शासकीय विभाग सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत आहेत.
विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होऊन त्या घटनेचे महत्त्व आजही तितकेच आहे. सोहळा दोन दिवस रोजी रायगडावर साजरा होत आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, शिववंदना, आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे या कार्यक्रमांसाठी गडावर येणाऱ्या शिवप्रेमी नागरिकांच्यासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन, औषधे, डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी , पोलिस अधिकारी कर्मचारी याची नियुक्ती केली आहे. महाड व माणगाव मार्गे येणाऱ्या खाजगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था तसेच आवश्यक ते माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.
राज्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात या वर्षी होणाऱ्या सोहळा कार्यक्रमांसाठी तयारी केली आहे. मागील वर्षी पाच लाखापेक्षा जास्त गर्दीमुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता . हा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे.