राजमाता जिजाऊ तलावातील कारंजा पुहा आला जागेवर; ठेकेदारांनी काम करताना बाजूला काढून ठेवला
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ : – नेरळ ग्रामपंचायत येथील राजमाता जिजामाता तलावाचे सुसोभीकरण करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्या मधील कारंजा हा काम करण्यसाठी ठेकेदाराकडून तलाव परिसरातच काढून ठेवला होता. ठेकेदाराने सांगितले असून एकूण तीन नवीन कारंजे येथे बसणार आहेत तर तलावांच्या मधोमध भव्य अशी राजमाता जिजाऊ यांचे पुतळा बसणार आहे त्या साठी लागणारे साहित्य उच्च दर्जाचे वापण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
१९९८ मध्ये तात्कालीन सरपंच सावळाराम जाधव यांनी नेरळ ग्रामपंचायतच्या मालकीचे असलेला तलावाचे सुशोभिकरण केले होते व मधोमध कारंजा बसवण्यात आले होते. बोटिंग चि व्यवस्था हि करण्यात आली परंतु मधल्या काळात बोटिंग बंद करण्यात आली ती अध्याप बंदच आहे व पुढील काळात पुन्हा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.