प्रहारचे रुग्णमित्र-गजुभाऊ कुबडे चा बैलबंदीवरील आमरण उपोषणा समोर बँक प्रशासन झुकले.

64

प्रहारचे रुग्णमित्र-गजुभाऊ कुबडे चा बैलबंदीवरील आमरण उपोषणा समोर बँक प्रशासन झुकले.

 Bank administration bows down to Gajubhau Kubde's death hunger strike
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- येथे तहसील कार्यालयासामोर 20 जानेवारी शेतकरी यांचा CCI चे चुकारे सेविंग खात्यात जमा करण्यात यावे यासाठी व हिंगणघाट येथील बँक ऑफ महाराष्ट्र ने शेतकऱ्यांनकडून सक्तीने वसूल केलेले अतिरिक्त व्याजाची रक्कम शेतकऱयांचा सेविंग खात्यात जमा करण्यात यावी यासाठी 20 जानेवारी पासून प्रहार जनशक्ती पक्षाचे विदर्भ प्रमुख रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांचे बैलबंदीवर आमरण उपोषण सुरू होते या आंदोलनाची हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभानजी खंडाईत यांनी घेत आज 21 जानेवारी ला सायंकाळी 7-30 ला घेत या मिटिंग साठी वर्धा येथील एल.डी. एम. श्री वैभवजी लहाने व बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा व्यावस्थापक श्री देव उपस्थित होते यावेळी एल.डी. एम.वैभव लहाने यांनी दोन्ही मागण्या तात्काळ मान्य करीत अतिरिक्त व्याजाची रक्कम 3 दिवसात शेतकऱयांचा खात्यात जमा करण्याची लेखी हमी तसेच CCI कडून मिळणारा चुकारा ही कर्ज खात्यात वळता झाला तरी तो चुकारा सेविंग खात्यात वळता करून शेतकरी यांचेशी चर्चा करूनच सामोरील कार्यवाही करू असे लेखी आश्वासन दिल्याने रुग्णमित्र- गजुभाऊ कुबडे यांनी हे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे जाहीर केले यावे उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभानजी खंडाईत यांनी ऊसाचा रस पाजून आंदोलन तोडले

मिटिंग संपताच एक मागणी पूर्ण झाल्याचे दिसून आले कारण शेतकऱयांचा खात्यात अतिरिक्त व्याजाचे पैसे शेतकऱयांचा खात्यात जमा झाल्याचे दिसून आले याला म्हणावं रुग्णमित्र-गजुभाऊ कुबडे यांचा दरारा यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख जयंत तिजारे, जगदिशभाऊ तेलहांडे, रुग्णसेवक-विनोद खंडाळकर, शैलेश झाडे, सुरज कापसे, सुरेश कापसे, कामडी, नितीन क्षीरसागर, राजू रुपारेल, गोपालभाऊ मांडवकर, जाम येथील उपसरपंच अजय खेडेकर, हनुमान हुलके इत्यादी उपस्थित होते