आर.जे.लोहिया विद्यालयात, सौंदड़ येथे  इ. 5 ते 8 वर्गाबाबत संयुक्त सभेचे आयोजन.

82

आर.जे.लोहिया विद्यालयात, सौंदड़ येथे  इ. 5 ते 8 वर्गाबाबत संयुक्त सभेचे आयोजन.

 Lohia Vidyalaya etc. Organizing joint meetings for classes 5 to 8.
टी.बी.सातकर

सौंदड़:- येथिल लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने इ. 5 ते 8 चे वर्ग सुरू करण्यासाठी ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघ यांची संयुक्त सभा दि.22/01/ 2021 रोज शुक्रवारला घेण्यात आली.

मा.जगदीश लोहिया-संस्थापक- संस्थाध्यक्ष,लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली, मा.गायत्रीताई इरले-सरपंच तथा अध्यक्ष-ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, मा.सुनील राऊत- उपसरपंच- ग्रा.पं.सौंदड, मा.नागलवाडे- ग्राम विस्तार अधिकारी, मा.यू.एस.वाघधरे- तलाठी-सौंदड, मा.ए.बी. ठाकरे- आरोग्य सेवक, मा.शमीम अहमद सैय्यद, मा.सचिन प्रभूदयाल लोहिया- सदस्य-ग्रा.पं.सौंदड, मा.नलीराम चांदेवार, प्राचार्य-मधुसूदन अग्रवाल, मुख्याध्यापक-मनोज शिंदे, हेडमिस्ट्रेस- श्रीमती संयुक्ता जोशी, श्रीमती कल्पना काळे-पर्यवेक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.
यावेळी मा.जगदीश लोहिया- संस्थापक संस्थाध्यक्ष यांनी “विद्यालयात दि.23 नोव्हेंबर 2020 पासून इ. 9 ते 12 चे वर्ग सुरू असून आजपर्यंत एकही विद्यार्थी कोविड-19 ने बाधित झालेले नाही ही गौरवाची बाब असून वर्ग 5 ते 8 चे वर्ग सुरू करण्यास काही हरकत नाही.” असे मत व्यक्त केले. तसेच मा.गायत्रीताई इरले- सरपंच तथा अध्यक्ष ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, मा.नागलवाडे- ग्राम विकास अधिकारी, मा.यु. एस. वाघधरे- तलाठी,सौंदड, मा.ए.बी. ठाकरे- आरोग्य सेवक, मुख्याध्यापक-मनोज शिंदे, हेडमिस्ट्रेस-श्रीमती संयुक्ता जोशी, पर्यवेक्षिका-श्रीमती कल्पना काळे, सहा.शिक्षक श्री.डी.एस.टेंभुर्ने तसेच पालक श्रीमती अंजुताई रामटेके यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दि.27 जानेवारी 2021 पासून ई.5 ते 8 चे वर्ग सुरू करण्यास काही हरकत नाही असे मत व्यक्त केले. सभेत प्राचार्य मधुसूदन अग्रवाल यांनी,” ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण देतांना अनेक अडचणी येतात, पालक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास असमर्थ असतात त्यामुळे इ. 5 ते 8 च्या वर्गास पालकांनी संमतीपत्र देऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे असे आवाहन केले.

यावेळी ग्राम कोरोना प्रतिबंधक समिती, शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.सहा. शिक्षक श्री.टी.बी.सातकर यांनी सर्वांचे आभार मानले.