रिचलाईन गृपच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
✍️ संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: म्हसळा तालुक्यातील नेवरुळ येथील रा. जि. प. मराठी शाळा व न्यु इंग्लिश स्कूल नेवरुळ या शाळांना रिचलाईन गृपच्या माध्यमातुन शैक्षणिक उपक्रम राबवुन शालेय विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, यामध्ये वह्या, कंपास, पेन, खाऊ, आदि शैक्षणिक साहित्य देण्यात आले. समाजसेवक व गृपचे सदस्य प्रदिप दिवेकर यांच्या संकल्पनेतुन म्हसळा तालुक्यातील १८ शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असे गृपचे सदस्य व समाजसेवक प्रदिप दिवेकर यांच्या कडुन सांगण्यात आले व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे हे आमचे दुसरे वर्ष असुन विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी देखील प्रयत्नशिल राहणार असे देखील म्हणाले, नेवरुळ स्कूलला लवकरच टिव्ही संच भेट देणार आहे असे बोलताना आश्वासन दिले. या वेळी शाळेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन दिवेकर यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमात उपस्थित रिचलाईन गृपचे सदस्य प्रदिप दिवेकर, विठ्ठल दिवेकर, चेअरमन रविंद्र लाड, मुख्याध्यापक मिणेकर सर, बैसाणेसर, अंगणवाडी सेविका सौ. निलाक्षी रिकामे,मदतनिस गिता दिवेकर, नामदेव महाडिक, तसेच सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.