रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींना निवडणुकांची प्रतिक्षा इच्छुक कार्यकर्ते संभ्रमात

रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींना निवडणुकांची प्रतिक्षा

इच्छुक कार्यकर्ते संभ्रमात

रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतींना निवडणुकांची प्रतिक्षा इच्छुक कार्यकर्ते संभ्रमात
रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग :- रायगड जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २४०ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडत असल्याने कार्यकर्ते व इच्छुक संभ्रमात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या निवडणुका आता विधानसभा निवडणुकापर्यंत लांबीवर पडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नेते- पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकासह आता अनेक ग्रामपंचायतीचा कारभारही प्रशासकांच्या हाती गेला आहे.

रायगड जिल्ह्यातील २४० ग्रामपंचायतीची मुदत संपली असून प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ९ फेब्रुवारी काढण्यात आली होती. यानंतर निवडणुका लागतील या अंदाजाने राजकीय पक्ष कामालाही लागले होते. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतच्या निवडणुकांकडे आयोगाचे फारसे लक्ष नसल्याचे दिसून येत आहेत. रायगड जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०४० या कालावधीत मुदत संपणाऱ्या २४० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग , पेण,कर्जत, श्रीवर्धन ,महाड, उरण, पनवेल हे सात विधानसभा मतदारसंघ येतात .ग्रामपंचायत निवडणुकीचा फायदा विधानसभा निवडणुकीत होत असल्याने मताधिक्याचा अंदाज बांधणी शक्य होत होते. त्यामुळेच ग्रामपंचायतच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीपूर्वी घ्याव्यात अशी अपेक्षा उमेदवाराकडून व्यक्त होत आहे
………….
इच्छुकांचा भ्रमनिरास

गावागावांमध्ये पक्षाकडून उमेदवारांची चाचणी सुरू असून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. मात्र निवडणुका लांबणीवर पडत असल्याने त्यांचाही भ्रमनिराश होत आहे. शिवसेने मध्ये व राष्ट्रवादीमध्ये पडलेले दोन गट त्यानंतर लोकसभेत राज्यात आघाडीला मिळालेली यश या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता अनेक ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्याने गावातील विकास कामांनाही खीळ बसली आहे .
,,,,,,,,,,,,,,,,,,,

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
अलिबाग ३४, मुरुड ४, पेण १८, पनवेल १५ ,उरण ८ ,कर्जत ३०, खालापूर ३, रोहा २६, सुधागड ६, माणगाव २१ ,तळा १८, श्रीवर्धन १६, म्हसळा ११ व महाड ३०
……….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here