तब्बल 49.64 लाख किमतीच्या बियाण्यांच्या विक्रीस बंदी

तब्बल 49.64 लाख किमतीच्या बियाण्यांच्या विक्रीस बंदी

तब्बल 49.64 लाख किमतीच्या बियाण्यांच्या विक्रीस बंदी

तब्बल 49.64 लाख किमतीच्या बियाण्यांच्या विक्रीस बंदी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 24 जून
जिल्ह्यातील विविध कृषी केंद्राची तपासणी केल्यानंतर उगवण क्षमता नसलेल्या तब्बल 49.64 लाखांच्या बियाण्यांची विक्री करू नये, असे आदेश जिल्ह्यातील 14 कृषी केंद्रांना देण्यात आले. तर अनधिकृत कापूस बियाणे, खत विक्री प्रकरणी 10 प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली.
जिल्ह्यातील विविध कृषी केंद्राची तपासणी करून त्रुटी असलेल्या 49.64 लाखांच्या बियाण्यांच्या विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. तर, 42.78 लाखांच्या खताची विक्री करण्यात बंदी घालण्यात आली. दरम्यान, शनिवारी पुन्हा 2 खत कंपन्यांना खत विक्री बंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले. किटकनाशकांची तपासणी करण्यात आली असून, 11 नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त व्हायचा असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर सिमेलगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याची आयात करण्यात आली. बोगस बियाण्यांची जिल्ह्यात विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाने करडी नजर ठेवली आहे. विविध ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. मूल, पोंभूर्णा, राजुरा, चिमूर, गोंडपिपरी व बल्लारपूर तालुक्यात अनधिकृत कापूस बियाणे जप्त केले असून, याप्रकरणी बोगस बियाण्यांची आयात करून साठवणूक करणार्‍या 8 जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, 1 कोटी 16 लाख 80 हजार 280 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात 64 क्किंटल खुले बियाणे व 312 पॉकीट जप्त करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात यंदा 4 लाखाहून अधिक हेक्टर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना आवश्यक बि-बियाणे व खते उपलब्ध व्हावीत यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. बियाणे किंवा खते खरेदी करताना पावती घ्यावी, बियाणे व खतांचा वाजवी भावापेक्षा जादा भाव कृषी केंद्र संचालकांना देऊ नये, तसे असल्यास शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍यांकडे तक्रार करावी. त्यानंतर लगेच कृषी विभागाकडून दुकानदारांवर कारवाई केली जाईल, अशी माहितीही जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत