चंद्रपूर उबाठा पक्षात नव्या नियुक्तीने नाराजी •नियुक्ती मागे न घेतल्यास राजीनामा देण्याचा इशारा •काही शिवसैनिक बसने मुंबईला रवाना

चंद्रपूर उबाठा पक्षात नव्या नियुक्तीने नाराजी

•नियुक्ती मागे न घेतल्यास राजीनामा देण्याचा इशारा
•काही शिवसैनिक बसने मुंबईला रवाना

चंद्रपूर उबाठा पक्षात नव्या नियुक्तीने नाराजी •नियुक्ती मागे न घेतल्यास राजीनामा देण्याचा इशारा •काही शिवसैनिक बसने मुंबईला रवाना

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

वरोडा : 27 जून
उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात नवीन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीला येथील ज्येष्ठ शिवसैनिक व विद्यमान जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आक्षेप घेतला असून, ही नियुक्ती परत घ्यावी या मागणीसाठी ते आपल्या शेकडो सहकार्‍यांसोबत मुंबईला रवाना झाले आहेत.
ही नियुक्ती रद्द न केल्यास वरोडा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकासह आपण राजीनामा देऊ व सैनिक म्हणून पक्षात कार्य करीत राहणार असून, वेळ पडल्यास आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा गुरुवार, 27 जून रोजी सायंकाळी येथील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेत जीवतोडे यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र येत असून यापूर्वी तीन-तीन विधानसभा क्षेत्रासाठी दोन जिल्हाप्रमुख नेमलेले होते. परंतु 26 जूनला उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर व वरोडा विधानसभा क्षेत्रासाठी रवींद्र शिंदे यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या नवीन आदेशानुसार जीवतोडे यांच्याकडील वरोडा या क्षेत्राचे प्रमुख म्हणून सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व उबाठाचे वरोडा विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांची नेमणूक केल्याचे आदेश आल्यामुळे तालुक्यातील शिवसैनिकात असंतोष पसरला आहे, असे पत्रपरिषदेत जीवतोडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here