जेष्ठ नागरिक संघ व रुक्मिणी पांडुरंग पोटले ट्रस्ट यांच्या संयुक्त पणे गरजु विदयार्थ्याना मोफत पुस्तक व वह्या वाटप
स्पर्धा परिक्षा द्या.उच्च शिक्षण घ्या व उदयाचे सनदी अधिकारी घडावे व तालुक्याचे नाव मोठे करा.. माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे.
✍️संतोष उध्दरकर.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: म्हसळा तालुक्यातील गरजू ८ वी ते १२वीच्या वर्गातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत माध्यमिक पुस्तक व वह्या वाटण्यात आल्या. याप्रसंगी म्हसळा नगरीचे माजी नगरध्यक्ष व शिवकृपा पतसंस्थाचे चेअरमन दिलीप कांबळे यांनी उपस्थित सर्व विदयार्थांना शुभेच्छा दिल्या व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आमच्या वेळी असे कोणी समाससेवक, अथवा कोणतीही संस्था या प्रकारे शैक्षणिक साहित्य देत नव्हती तरी देखील आम्ही शिक्षण घेतले पण आता तुम्हाला उच्च शिक्षण मिळत आहे, स्पर्धा परिक्षा सारखे आयोजन करीत आहेत, अनेक सामाजिक संस्था शिक्षणासाठी पुढे येत आहेत,त्यामुळे अशा गोष्टींचा लाभ घ्यावा व त्यांनी केलेली शैक्षणिक मदत यांचे सार्तक करा आणि उदयाचे मोठे सनदी अधिकारी घडावे या बाबतीत बोलुन दिलीप कांबळे यांनी विद्यार्थी यांचे मनोबल वाढविले, तसेच म्हसळा टाईम्स बद्दल बोलताना जुन्या गोष्टींना उजाळा देत म्हसळा टाईम्स कशा पद्धतीने पुढे आला व म्हसळा टाईम्स च्या वतीने असे उपक्रम राबविण्यात येत आहेत खरच खुप कौतुकास्पद आहे असे देखील कांबळे यांनी सांगितले, म्हसळा टाईम्सचे संपादक रमेश पोटले यांनी उपास्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले व म्हसळा टाईम्स स्पर्धेत टिकण्यासाठी तुमच्या सर्वांचे महत्वाचे सहकार्य लाभले म्हणुन या स्पर्धेच्या युगात अनेक वर्तमान पत्र असताना देखील म्हसळा टाईम्स तेवढ्याच ताकदीने उभा आहे असे रमेश पोटले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. विद्यार्थी यांच्या चेहर्यावरील आनंद पाहुन सर्वांनी समाधान व्यक्त केले. या वेळी उपस्थित शिवकृपा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,
दि म्हसळा टाइम्सचे संपादक व ट्रस्टीचे रमेश पोटले, भाजप रायगड युवा जिल्हा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर, पत्रकार संतोष उध्दरकर,कुणबी समाजाचे हरिश्चंद्र कानसे, जेष्ठ नागरिक संघ पदाधिकारी गोविंद बोर्ले, सुधाकर शिर्के, रामचंद्र भुवड,अलीम, पांडुरंग निर्मळ, तुकाराम जोशी व विध्यार्थी, विध्यार्थिनी उपस्थित होते.