अलिबाग शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करा -अमर वार्डे

अलिबाग शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करा -अमर वार्डे

अलिबाग शहरातील कचरा उचलणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाई करा -अमर वार्डे

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
9420325993

अलिबाग : अलिबाग शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस मर्यादित या ठेकेदार कंपनीवर करारभंग केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी अलिबाग नगर परिषदेचे माजी नगरसेवक अमर वार्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.या कामासाठी होणारा खर्च हा पंधरावा वित्त आयोगातील असल्याने या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

अलिबाग नगर परिषदेने शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छता ठेवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ येथील व्हीडीके फॅसिलिटी सर्व्हिसेस मर्यादित कंपनीला ठेका दिला आहे. मात्र शहरातील कचरा नीट उचलला जात नाही. याबाबत अमर वार्डे यांच्यासोबत नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच भाजपने ही तक्रार केली होती.
हा ठेका देताना नगरपरिषद आणि ठेकेदार कंपनीत लेखी करार झाला आहे. या करारातील अटी शर्तीचा कंपनीकडून भंग झाला असल्याचा दावा अमर वार्डे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात केला आहे. करारानुसार शरीरातील कचरा संकलनासाठी दहा ते बारा गाड्या वापरणे अपेक्षित आहे. मात्र येवढ्या गाड्या शहरात कधीच वापरत असताना दिसून आलेले नाही. 42 पानी करारातील अनेक अटी शर्तीचे ठेकेदार कंपनीने पालन केलेले नाही.
शहरातील कचरा संकलनात अनेक त्रुटी आहेत. असे असताना ठेकेदार कंपनीला नगरपरिषदे कडून पाठीशी घातले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनी आणि अलिबाग नगरपरिषद या दोघांवरील कारवाई करावी अशी मागणी अमर वार्डे यांनी जिल्हाधिकारी यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here