सौंदड लोहिया विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती संपन्न.

सौंदड:- येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,रामदेवबाबा अद्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने सौन्दड येथे थोर देशभक्त ,महान क्रांतिकारक व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दि .23 जानेवारी 2021रोज शनिवारला विद्यालयात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गुलाबचंद चिखलोंडे व पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे उपस्थित होते. मान्यवरांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मधुसूदन अग्रवाल तसेच सहाय्यक शिक्षक श्री.पी. एस.कापगते व शिक्षिका कु.डी.व्ही.उजवणे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.यु.बी.डोये यांनी केले तर आभार श्री.पी.डी. हटकर-स.शि.यांनी मानले.