चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 21 वर्षीय आरोपीला अटक.

58

चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 21 वर्षीय आरोपीला अटक.

चंद्रपूर:- जिल्ह्यात जिवती अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ही संतापजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

घरच्या शेतमजुराने 2 वर्षीय मुलीला बाहेर फिरवण्याच्या बहाण्याने दुचाकीवर नेले. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करून घरी सोडल्यावर कुटुंबीयांना हा संपूर्ण प्रकार लक्षात आला. आधी जिवती व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात चिमुरडीवर उपचार करण्यात आले आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचंही स्पष्ट झालं.

याप्रकरणी रामनगर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि आरोपीचा शोध सुरू झाला. चिमुरडीवर निर्दयीपणे अत्याचार करण्याऱ्या नराधमाला रामनगर पोलिसांनी जिवती पोलिसांच्या सक्रियतेने अटक केली. आकाश पवार असं अटक करण्यात आलेल्या 21 वर्षीय आरोपीचं नाव आहे.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. विश्वासाने घरातील शेतमजुराकडे सोपवलेल्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या या घटनेमुळे पीडितेचं कुटुंब हादरून गेलं आहे. आरोपी आकाश पवार याला याप्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अधिक तपास जिवती पोलीस करीत आहे.