After the Nashik surgery, the breastfeeding mothers slept on the floor in the bitter cold.
After the Nashik surgery, the breastfeeding mothers slept on the floor in the bitter cold.

नाशिक शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत स्तनदा मातांना फरशीवर झोपवले.

नाशिक:- अत्यंत संतापजनक बातमी. कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा मातांना कडाक्याच्या थंडीत रूग्णालयात फरशीवर झोपवण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ठाणापाडा आणि शिरसगाव या आरोग्य केंद्रांवर हा प्रकार घडला.

शिरसगाव आरोग्य केंद्रात चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा महिलांना चक्क थंडगार फरशीवर झोपविण्यात आले होते. अत्यावश्यक सेवेची कोणतीही सोय नसताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा धक्कादायक प्रकार केला. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झाल्यानंतर 25 बाय 25 च्या खोलीत कोंडवाड्याप्रमाणे या महिलांना ठेवण्यात आले.

प्रसार माध्यमातून धक्कादायक आणि संतापजनक प्रकाराची व्हिडिओ प्रसारीत झालि आहेत. यात कशाप्रकारे महिलांना आरोग्य केंद्रात रात्रभर प्रचंड थंडीत झोपवण्यात आले, हे स्पष्ट दिसून येत आहे. कुटुंब नियोजनाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या स्तनदा मातांच्या जिवाशी खेळ कऱण्याचा संतापजनक प्रकार करण्यात आला आहे. दिवसभर या महिलांकडे कोणी नंतर लक्ष दिले नसल्याने जिल्हा परिषद सदस्य रुपाली माळेकर यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here