अमान क़ुरैशी/प्रतिनिधि 8275553131
नागभीड़: (Chandrapur) नागभीड़ तालुक्यातील आलेवाही ग्रामपंचायत हद्दीतील जीवनापुर गावात नळाच्या पिण्याच्या पाण्यात दोन फूट लांबीचा नारू सदृश जंतु आढळल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी जीवनापुर गावातील मधुकर धवळे यांच्या पत्नीने नळावर पिण्याचे पाणी भरत असताना गुंडा मधील पाण्यात हा नारू सदृश जंतु दिसला. त्यांनी हे जंतु परिसरातील लोकांना दाखविल्यावर नागरिकांमध्ये चिंतेची लहर पसरली आहे.
जीवनापुर येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मधुकर धवळे यांनी या घटनेची तक्रार ग्रामपंचायत आलेवाही येथे केली आहे. हा नारू सरासरी दोन फूट लांबीचा असून जिवंत असल्याने ग्रामपंचायत आणि आरोग्य उपकेंद्र यांनी याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. पाण्यातून नारू आढळणे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संबंधित विभागांनी या समस्येकडे गंभीरपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे नागरिकांचे मत आहे.