शासकीय आय.टी.आय हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

52

शासकीय आय.टी.आय हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.

 Organizing Blood Donation Camp at Government ITI Hinganghat.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज दिनांक रोजी औ. प्र.संस्था हिंगणघाट व उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने औ.प्रा.संस्था हिंगणघाट येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाततील डॉ. लिडबे आणि त्यांचे चमू यावेळी शिबिरात उपस्थित होते. संस्थेचे प्राचार्य आदरणीय राकेशकुमार कोडपे साहेब यांनी प्रथम रक्तदान केले. त्यानंतर संस्थेतील गट निर्देशक बांते सर,एम.एच.गायकवाड सर, पटले सर, माळी मॅडम, चोपडे मॅडम पायल मुजेवार मॅडम तसेच संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. संस्थेतील प्रशिक्षणार्थीनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. संस्थेचे प्राचार्य नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम राबवितात समाजाचे आपले काही देणे लागते प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व याची जाणीव बाळगता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.