जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात ३ सप्टेबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

✒️विशाल सुरवाडे ✒️
जळगाव ब्युरो चीफ
📞9595329191📞

जळगाव दि. 28- जिल्हास्तरावर लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. तथापी,सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी २ सप्टेंबर २०२४ या दिवशी शासकीय सुट्टी असल्यामुळे या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार ३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी आपल्या संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.