गेल इंडिया लिमिटेड, उसरच्या वतीने नाईक कुणे गावातील महिलां घेत आहेत स्वसंरक्षण प्रशिक्षण…

गेल इंडिया लिमिटेड, उसरच्या वतीने नाईक कुणे गावातील महिलां घेत आहेत स्वसंरक्षण प्रशिक्षण...

गेल इंडिया लिमिटेड, उसरच्या वतीने नाईक कुणे गावातील महिलां घेत आहेत स्वसंरक्षण प्रशिक्षण…

गेल इंडिया लिमिटेड, उसरच्या वतीने नाईक कुणे गावातील महिलां घेत आहेत स्वसंरक्षण प्रशिक्षण...
अलिबाग तालुका प्रतिनिधी
रत्नाकर पाटील
९४२०३२५९९३

अलिबाग ;:गेल इंडिया लिमिटेड, उसर यांच्यावतीने नाईक कुणे गावातील महिला व मुलींसाठी पाच दिवसीय मोफत स्वसंरक्षण स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अनुप गुप्ता – मुख्य महाप्रबंधक पीडीएचपीपी प्रोजेक्ट गेल उसर व जितिन सक्सेना – महाप्रबंधक, शितल लाकरा – मुख्य प्रबंधक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शशिकला धसाडे पोलीस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी नंदकुमार गोंधळी, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सूर्यकांत ठाकूर, वैशाली दत्तात्रेय नाईक, शिल्पा नाईक, नमिता नरेश ठाकूर, सारिका सुधाकर नाईक, निवेदिता विलास नाईक, सुप्रिया सुरेश नाईक प्रशिक्षिका प्रणाली तळेगावकर, हर्षाली नागावकर, वेदिका लाडगे व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी शशिकला दिनेश धसाडे यांनी उपस्थित महिला व मुलींना शुभेच्छा देत स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगितले व प्रिझम सामाजिक विकास संस्थेस शुभेच्छा दिल्या तर तपस्वी गोंधळी यांनी या पाच दिवसाच्या स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरामध्ये कशाप्रकारे प्रशिक्षण दिले जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणास नाईक कुणे गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.