शिक्षकांकडून विद्यार्थीनीचा विनयभंग वरोडा बंद

शिक्षकांकडून विद्यार्थीनीचा विनयभंग वरोडा बंद

शिक्षकांकडून विद्यार्थीनीचा विनयभंग
वरोडा बंद

शिक्षकांकडून विद्यार्थीनीचा विनयभंग वरोडा बंद

• शिक्षकांवर गुन्हा दाखल तसेच शाळेने केले निलंबन
• पलायनाच्या तयारीत असणाऱ्या दोन्ही शिक्षकांना अटक

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

वरोडा : 30 ऑगस्ट
शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील दोन शिक्षकांनी त्याच विद्यालयाच्या विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. त्या दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, संतप्त नागरिकांनी शाळेसमोर निदर्शने केली. त्यानंतर शाळेने या दोन्ही शिक्षकांना निलंबित केले असल्याची माहिती आहे.
शुक्रवारी शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर तोंडाला काळ्या पट्टया बांधून निषेध नोंदवत मुक आंदोलन केले. शनिवार, 31 ऑगस्ट रोजी वरोडा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने दोन्ही शिक्षकांना निलंबित केल्याची माहिती शाळा व्यवस्थापन सचिवांनी दिली आहे. तर याप्रकरणी वरोडा पोलिसांनी त्या शिक्षकांविरूद्ध विनयभंग व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन्ही आरोपी पसार होण्याच्या तयारीत असताना दोघांना ही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे अशी आरोपींची नावे आहेत.
आरोपी बेलेकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थीनी अध्यापक कक्षात गेल्या. पीडित विद्यार्थीनीने बेलेकर यांना शुभेच्छा देत नमस्कार केला. त्यावेळी तुला पार्टी देतो, असे बेलेकर म्हणाले. त्यानंतर दुपारी पारखे नामक शिक्षकाने विद्यार्थीनीला भ्रमणध्वनी करून आपल्या खोलीवर बोलावून घेतले. ती विद्यार्थीनी धनंजय पारखे यांच्या खोलीवर आली. त्यावेळी तिकडे बेलेकर उपस्थित होते. तेथे त्यांनी तिला वाढदिवसानिमित्त डेरी मिल्कचे चॉकलेट दिले व लगेच रिटर्न गिफ्ट मागितले. रिटर्न गिफ्टमध्ये मिठी मारण्याचा प्रस्ताव विद्यार्थीनीपुढे ठेवण्यात आला. विद्यार्थीनीने तो प्रस्ताव नाकारला. त्यांनी जबरीने विद्यार्थीनीचा हात पकडून मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. धास्तावलेल्या विद्यार्थीनीने घरचा रस्ता पकडला. घरी पोहचताच घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानुसार तक्रार नोंदवली गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्याकडे जबाबदारी दिली. कोंडावार यांनी तात्काळ पथक पाचारण करीत पळण्याच्या तयारीत असणार्या त्या दोन्ही शिक्षकांना रेल्वे स्टेशन वरून अटक करण्यात आली. पुढील तपास वरोडा पोलिस करीत आहेत.