सांगली निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या.

60

सांगली निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी, मुलासह आत्महत्या.

सांगली जिल्ह्यातील एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे बेळंकी गावात खळबळ माजली आहे.

सांगली :- सांगलीमध्ये कौटुंबिक आत्महत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवृत्त पोलीस हवालदार‌ाने पत्नी आणि मुलासह गळफास लावून आत्महत्या केली आहे. सांगली जिल्ह्यातील बेळंकी गावात ही घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस दलही हादरले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नासो गुरसिद गव्हाणे वय 65 असं आत्महत्या करणाऱ्या निवृत्त पोलिसाचं नाव आहे. तर मालन अन्नासो गव्हाणे वय 50 पत्नी आणि मुलगा महेश अन्नासो गव्हाणे अशी मृतांची नावे आहेत. एकाच घरातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.