काटेरी झुडूपात आढळले सहा महिन्यांचे बाळ; अनैतिक संबंधातून जन्मल्याची चर्चा.

धारणी शहरापासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या उकूपाटी जवळील काटेरी झुडूपात बाळ असल्याची माहिती धारणी पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे बाळ मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी बाळ फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.
अनैतिक संबंधातून हे बाळ जन्माला आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. सदरील बाळाबाबत आजूबाजूच्या गावातील पोलिस पाटील व नागरिकांना माहिती दिली आहे. लवकरच त्या बाळाच्या माता-पित्याचा सुगावा लागेल. कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी दिली.