गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला;मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला;मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

गणरायाच्या स्वागतासाठी चाकरमानी निघाले गावाला;मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

रोहा तालुका प्रतिनिधी
✍️आशीष प्रकाश कोठारी ✍️
📞7507493900📞

कोलाड : येत्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले असून या साठी मोठ्या प्रमाणात नागरीक कोकणात निघाले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी कामानिमित्त आणि व्यवसायानिमित्त अनेक कोकणवासी स्थायिक झाले आहे. असे असले तरी दरवर्षी हे नागरीक गणेशउत्सवासाठी गावी जात असतात. त्यामुळे आज सकाळ पासून मुंबई कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल 5 ते 7 किमी रांगा लागल्या आहेत.
आज सकाळपासून मुंबई कोकण महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुले प्रवासाचेही हाल होत आहेत. ट्रॅफिक सुरळीत करताना पोलीसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. गणेशउत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई, सुरत, अहमदबाद वांद्रे, पनवेल वरून 310 विशेष गाड्या सुटणार आहेत.गावी जाण्यासाठी प्रवासाने मोठी गर्दी केली असून प्रवासाच्या सुरक्षरसाठी जवळपास 150 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत,तस्सेच प्रवासाच्या सोयीसाठी यात्री सहायक तैनात करण्यात येणार आहेत.
गणेशउत्सवासाठी चाकरमानी कोकणात निघाले असतानाच यादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. Ya प्रवासात चाकरमान्यांना कोणतेही त्रास होऊ नये, विशेषत: वाहतूक कोंडीचा समस्या फार काळ टिकू नये यासाठी रायगढ पोलिससांनि कंबर कसली आहे, द्रोण च्या साहाय्याने वाहतुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे महामार्गावर मोठंपोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here