'त्या' अज्ञाताचा शोध घेऊन चौकशी बसवा

‘त्या’ अज्ञाताचा शोध घेऊन चौकशी बसवा

• चंद्रपूर जागृती मशाल मंचची पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा

'त्या' अज्ञाताचा शोध घेऊन चौकशी बसवा

🖋️ नेहा शंकर
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
📱8830857351

चंद्रपूर : 8 सप्टेंबर
दिवसेंदिवस चंद्रपूर जिल्ह्यात वाढणारे महिलांवरील अत्याचार या प्रश्नाला घेऊन चंद्रपूर जागृती मशाल मंचची पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली. पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांचेशी भेटून यावर चर्चा करण्यात आली व अश्या नराधमांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जागृती मशाल मंच ने ऍड. पारोमिता गोस्वामी यांच्यातर्फे करण्यात आली. अन्य काही ज्वलंत विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली. काही पिडीत लोक चंद्रपूर जागृती मशाल मंच कडे आपली समस्या घेऊन आले. त्यानुसार चंद्रपूर येथील एका तरुणीचे शव नागपूर येथे रेल्वे रुळावर भेटले असून सदर मुलगी चंद्रपूर येथील तुकुम गुरुद्वारा येथील अभियांत्रिकीला शिकणारी मुलगी नागपुर मनीष नगर, रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळली. मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून घातपात असण्याची शक्यता वर्तविली. या घटनेचा योग्य तपास करुन कड़क चौकशी व्हावी, अशी मागणी जागृती मशाल मंच ने केली. एका अज्ञात व्यक्तिने मृत्यूपश्चात त्या मुलीची बदनामी करणारी बातमी वर्तमानपत्रात छापली, त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यावर चौकशी बसवावी व आरोपीस कड़क शिक्षा द्यावी. अशी मागणी चंद्रपूर जागृती मशाल मंच च्या सर्व महिलांनी पोलिस अधीक्षक यांना केली. या वेळी अश्विनी खोबरागड़े, वर्षा जमादार, ॲड. तबस्सुम शेख व मुलीचे आईवडील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here