'शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन'

‘शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन’

• डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

'शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन'

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 7 सप्टेंबर
शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे वीरई ग्राम पंचायत येथे डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानग्रस्त भागाची नोंदणी करून सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा झाली नाही. हा गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय आहे. अन्यायग्रस्त शेतकऱ्यानां न्याय मिळवून देण्यासाठी तसेच ही माहिती सर्व सामान्य शेतकरी बांधवांपर्यंत पोहचावी गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी, यापुढील भूमिका काय राहील यासाठी ही बैठक घेण्यात आली. डॉ. गावतुरे यांनी यावर गांभीर्याने विचार करून तातडीने संबंधित विभागाला संपर्क करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे त्या म्हणाल्या. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच शांताबाई गेडाम, काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक वाढई, काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष विक्रम मोहरले, नेताजी सोनुले ,नंदकिशोर वाढई,उत्तम गणवीर, शशिकांत जेंगठे, सुरज गिरडकर,सुखदेव वाढई, भुजंग आगळे, रमेश वाढई, बंडू निकोडे ,मोरेश्वर गोंगले ,पुरुषोत्तम गोंगले, सुरेश सोनुले ,सुरेश माहुर्ले, सदाशिव वसाके, संतोष गुडलावार, नंदकिशोर वाढई, प्रशांत जेंगठे, नवनाथ जेंगठे व सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here