जळगाव जिल्हयांतील वाळू माफियावर एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई

जळगाव जिल्हयांतील वाळू माफियावर एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई

जळगाव जिल्हयांतील वाळू माफियावर एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई

विशाल सुरवाडे
जळगाव ब्युरो चीफ
9595329191

जळगाव – जळगाव जिल्हयांतील फैजपूर पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील वाळू माफिया गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदया अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
फैजपूर पो. स्टे. हद्दीतील स्थानबध्द इसम ज्ञानेश्वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी वय ३६ रा. कोळन्हावी ता. यावल जि. जळगाव याचे विरुध्द ०९ गुन्हे दाखल आहेत.
फैजपूर पो.स्टे. चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. रामेश्वर मोताळे यांनी तयार करुन सदरचा प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सादर होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर मा. जिल्हाधिकारी सो. जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता.
त्यानुसार दि.०५/०९/२०२४ रोजी मा.श्री. आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव यांचे कडील आदेश क्र. दंडप्र कावि/एमपीडीए/३४/२०२४ अन्वये कोल्हापूर जि. कोल्हापूर या कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार फैजपूर पो.स्टे. चे तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक, श्री. निलेश वाघ, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. रामेश्वर मोताळे, पोउनि.मैनुद्दीन सैय्यद, सफौ योगेद्र मालविया, पोहेकों योगेश महाजन, पोना/समाधान पाटील, पोकों/नावकर, पोहेकों/अनिल पाटील अशांनी स्थानबध्द इसमास दि.०६/०९/२०२४ रोजी ताब्यात घेतले आहे. सदर स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर जि. कोल्हापूर येथे दाखल करण्यासाठी रवाना झाले आहे.
वरील स्थानबध्द इसमाचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
तरी सुध्दा त्याचे वर्तनात सुधारणा झाली नसून तो पुन्हा गुन्हे करण्याची सवय सुरुच ठेवली. वरील एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे मा.डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती अन्नपूर्णा सिंह, सहा. पोलीस अधीक्षक, फैजपूर उपविभाग, फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.निरी. श्री. बबन आव्हाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव व त्यांचे अधिनस्त पोहेकों/सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकों/जयंत भानुदास चौधरी, पोहेकों रफिक शेख कालु, पोहेकॉ संदिप चव्हाण, पोकों/ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here