बॅग लिफ्टींग करणारे तिन्ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

बॅग लिफ्टींग करणारे तिन्ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

बॅग लिफ्टींग करणारे तिन्ही आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात

✒️विशाल सुरवाडे ✒️
जळगाव ब्युरो चीफ
📱9595329191📱

जळगाव – दिनांक 09/09/2024 रोजी जळगाव शहरातील दादावाडी जैन मंदिराजवळ बॅग लिफ्टिंग झाल्याचे स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना माहिती मिळाली. माहिती मिळतच त्यांनी सदर घटनास्थळी IDBI बँकेचे ATM जवळ फिर्यादीस भेटून त्यांना सविस्तर विचारपुस केली असता, तिन अज्ञात इसमांनी फिर्यादीचे गाडीत बसलेल्या फिर्यादांचे मूलाचे लक्ष विचलीत करून गाडीतील बॅग मध्ये ठेवलेले १,२०,०००/- रु. कि.ची बॅग गाडीतून चोरुन नेल्याचे सांगीतले.
त्यावर मा.श्री बबन आव्हाड, बरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, सफो रवि नरवाडे, विजयसिग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोह राजेश मेंडे, हरिलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम. स्वागूशा जळगाव अशांना कळवून तात्काळ तिन अज्ञात इसमांचा शोध घेणे बाबत आदेश दिलेत. त्यावरून सदर पथकाने तांत्रिक पध्दतीने व बौध्दीक कौशल्याचा वापर करून, मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मो.सा.क्र. MH१९EH९९७४ वरील तिन अज्ञात इसम हे भुसावळ कडे गेल्याचे समजल्याने त्यांचा पाठलाग करीत असतांना भुसावळ गावापासून बोदवड कडे जाणाऱ्या रोडने जात असतांना सदरचे इसम हे मो.सा.ने पुढे जात असल्या बाबतची तांत्रिक माहिती मिळाल्याने त्यांचा पाठलाग सुरु ठेवला त्यावेळी मोडाळे गावाचे पुढे साधारण १ कि.मी. अंतरावर कच्चा रस्त्याने त्यांनी त्यांची मो.सा. वर जात असतांना बरोल पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा व आवाज दिला असता त्यांनी गाड्या रस्त्यावर सोडून कपाशाच्या व मक्याच्या शेतामध्ये पळू लागले त्यावेळी वर पथकातील अधिकारी व अर्मलदार यांनी त्यांचा पाठलाग करून कापशाच्या व मक्याच्या शेतामधुन तिन इसमांना ताब्यात घेतले, त्यावेळी त्यांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याचे कडून १,२०,०००/- रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याने त्यांना रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले मोटार सायकल हे पुढील तपासकामी जळगाव तालुका पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here