समुद्रपूर येथील भालकर वार्डात नाल्याचे काम थुकपालिश
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक ✍🏻
मो 8208166961
समुद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर नगर पंचायत अंतर्गत भालकर वार्ड नंबर ५ मधील प्रकाश चौधरी यांच्या घरापासून ते खुडसंगे यांच्या घरापर्यंत नाल्या व पाईप टाकण्याच्या कामाचे कंत्राट निघाले होते. तेथील एका कंत्राटदाराने ते कंत्राट घेतले व कामाला सुरवात देखील केली पण त्यांच्या कडे काम करणाऱ्या माणसानी ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले आणि या कामाबद्दल भालकर वार्डातील स्थानिक हे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम का बर करत आहात असे येथील लोकांनी विचारणा केली असता त्या कंत्राट दाराच्या माणसाना तेथील येथील स्थानिक लोकांशी अरेरावी ची भाषा वापरून जसे काम झाले आहे ते खुप झालं ज्यांना ज्यांना काही करायचे ते करा आम्ही बघून घेऊ असे शब्द वापरून तेथील नाल्याचे काम थुलपालिश करून निघून गेले. या बातमी द्वारे भालकर वार्डातील जनतेचे शासनाला निवेदन आहे की अशा थुक पालिश करणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि भालकर वार्डातील नाल्याचे काम परत सुधारणा करून देण्यात यावे अशी येथील जनतेची मागणी करत आहेत आणि असे न झाल्यास येथील जनतेने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.