जळगाव तालुक्यातील भोकर येथे कपाशीच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

जळगाव तालुक्यातील भोकर येथे कपाशीच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखलजळगाव तालुक्यातील भोकर येथे कपाशीच्या शेतात गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

✍️विशाल सुरवाडे ✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱मो.9595329191📱

जळगाव – जळगाव तालुक्यातील भोकर- पडसाद शिवारात गांजाची शेती करणाऱ्या प्रकाश दशरथ सोनवणे (५८, रा. भोकर ता.जळगाव ) या शेतकऱ्यावर कारवाई करून गांजाची २७ झाडे जप्त करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव हद्दीतील भोकर गावात एका शेतात कपाशीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावण्यात आलेली आहे अशी गुप्त माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांना मिळाली होती. माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी लगेचच जळगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना गुप्त माहितीप्रमाणे मार्गदर्शन करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्या.त्या नंतर महेश शर्मा यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अनंत अहिरे व अमलदार पोहेकॉ. बापू पाटील, किरण आगोने, दीपक चौधरी, दिनेश पाटील, चेतन पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी नायब तहसीलदार दिलीप बारी, कृषी अधिकारी अमित भामरे, वजन मापे निरीक्षक अनंत पाटील यांना बोलून खात्री करत पंचनामा केला. झाडांची वजन १२ किलो व अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे एकूण २७ झाडे जप्त करण्यात आली. व प्रकाश सोनवणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here