जिओ मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक तर एक फरार

जिओ मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक तर एक फरार

जिओ मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक तर एक फरार

✍️विशाल सुरवाडे ✍️
जळगाव ब्युरो चीफ
📱मो.9595329191📱

जळगाव -श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जळगाव जिल्ह्यात मोबाईल टॉवरचे बैटरी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.
त्यावरुन मा.श्री बचन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, बिलास गायकवाड, भारत पाटील, सर्व नेम, स्था.गु.शा. जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मंगरुळ गावातील भिकन गुवराज पाटील हा संशयीत असल्याची बातमी मिळाली त्यावरून त्यांनी सदर संशयीतास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून मोबाईल टॉवरचे बॅटरी व त्याचे अजुन साथीदार आहेत का? याचाबत विचारपुस केली असता त्याने सांगितले की, माझे सोबत धर्मेद्र फकिरा पाटील, रा.मंगरुळ व अकरम अली कमरअली रा. गांधीपुरा अमळनेर यांचे नाव सांगीतल्याने धर्मेद्र फकिरा पाटील यास ताब्यात घेवून अकरम अली कमरअली याचा अमळनेर शहरात शोध घेतला परंतु तो फरार झालेला आहे.त्यावर भिकन पाटील व धर्मेद्र पाटील यांना मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या बाबत विचारपुस केली असता भिकन पाटील त्याच्याकडून मोबाईल टॉवरचे एकुण १२ बैटऱ्या जप्त करण्यात आले आहेत.

त्यावेळी भिकन युवराज पाटील यास सदर बॅटऱ्या बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी, धर्मेंद्र पाटील व अकरम अली अश्या तिघांनी मिळून मारवड व अमळनेर शिवरात असलेल्या जिओ मोबाईलच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगीतले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यावेळी नमुद पथकाने मुख्य आरोपी भिकन युवराज पाटील याची माहिती घेता तो यापूर्वी मोबाईल टॉवरचा टेक्नीशनचे काम करीत होता तसेच तो बंटरी चोरी करतांना त्याचे यापुवीचे जिओ कंपनीची ओळखपत्र वापरुन चोरी करीत होता त्यामुळे त्यांचेवर कोणी संशय घेत नव्हते.
आरोपी १) भिकन यबूराज पाटील, २) धर्मेद्र फकिरा पाटील, रा. मंगरुळ ता. अमळनेर या दोघांना तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले TATA ACE (छोटा हत्ती) मालवाहतुक गाडी मारबड पो.स्टे. या गुन्ह्यात पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here