शासनाने चंद्रपुर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंताला हक्काचे कामे द्या

शासनाने चंद्रपुर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंताला हक्काचे कामे द्या

अध्यक्ष इंजिनियर जगदीश लवाडिया

शासनाने चंद्रपुर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंताला हक्काचे कामे द्या

✍️जितेंद्र नागदेवते✍️
सिंदेवाही ग्रामीण प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही :- शासनाने शासकीय निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंताला हक्काचे 33%कामे द्या अन्यथा चंद्रपूर राज्य अभियंता संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात धरणे आंदोलन माध्यमातून कामे मिळवावे लागेल असे प्रतिपादन अभियंता दिन निमित्य आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष इंजि जगदीश लवाडिया यांनी केले.
सविस्तर वृत्त असे की राज्य अभियंता संघटनेच्या वतीने नुकतेच अभियंता दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर येथे आयोजित करून मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष इंजि जगदीश लवाडिया हे होते तर
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून – धारीवाल पावर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक निलेश गोखरे, जीएमआर पावर कंपनीचे
महाव्यवस्थापक परेश कुकूडकर, पावर जनरेशन कंपनीचे पुंडलिक वनवे, , महासचिव ओंकार ऊपलंचीवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थावरुन इंजी जगदीश लवाडिया बोलताना सांगितले की शासन सुशिक्षित बेरोजगार अभियंताला हक्काचे कामे उपलब्ध करून देत नाही. अनेक कामे क्लब करून सुशिक्षित बेरोजगार याना डावले जाते. शासन निर्णयानुसार 33% कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंताला देण्याबाबत शासन पत्रक असुन सुद्धा कामे मॅनेज केले जात आहे. प्रत्येक विभागात मोठय़ा प्रमाणावर कामे असताना सुशिक्षित बेरोजगार अभियंताला कामे दिली जात नाही पंरतु यानंतर अधिकार्‍याची कोणतेही ऐकले जाणार असे यांनी यावेळी सांगितले .
अभियंता दिन निमित्य राज्य अभियंता संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व अध्यक्षांना नियुक्त प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच यावेळी मान्यवरांनी उपस्थित अभियंत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अभियंता संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here