डेंग्यू मुळे नेरळ येथे चिंतेचे वातावरण; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

डेंग्यू मुळे नेरळ येथे चिंतेचे वातावरण; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

डेंग्यू मुळे नेरळ येथे चिंतेचे वातावरण; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ:दि. १७ सप्टेंबर २०२४ नेरळ येथील आज खाजगी ट्रस्ट रुग्णालयात तिन रुग्ण हे डेंग्यू सदृश मुळे दाखल झाले आहेत. त्यातील एका बालकाला उपचार करून घरी सोडण्यात आले आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे. आत्ता पर्यत १० ते १२ रुग्ण येऊन औषधोपचार करून गेले आहेत तर दोघांवर औषधोपचार सुरु आहेत.

या आधीही नेरळ येथील एक तरुण वकील मुस्तफा उर्फ राजू रफिक अत्तार याचा डेंगू सदृश या आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तरी देखील प्रशासनाला अजून जाग कशी आली नाही? असा संतप्त सवाल नागरिकांन कडून केला जात आहे . त्यातच नेरळ ग्रामपंचायत प्रसासना मार्फत स्टेशन आळी परिसरात व इतर ठिकाणी औषध फवारणीही केली जात नाही. कर मात्र न चुकता वसूल केला जात आहे व मुलभूत सुविधांचा अभाव मात्र पडत आहे असे स्थानिकांन मार्फत आरोप केले जात आहे.

यापूर्वी देखील मोहसीन मार्केट (लस्सी गल्ली) शेजारी असलेली गटारे तुडुंब भरली आहेत हे नेरळ ग्रामपंचायत सांगण्यात आले होते. पण त्यावर नेरळ ग्रामपंचायतीने कोणतीच पावले न उचल्याने आज दोन रुग्ण हि डेंगू सदृश ह्या आजाराने त्रस्त झाली आहेत. अत्त्ता तरी प्रशासन या कडे लक्ष देणार का ?

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणं म्हणजे अधिक तीव्रतेचा ताप (हाय ग्रेड फिवर), डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे. ह्याव्यतिरिक्त कमी तीव्रतेची लक्षणं, जसे उचक्या लागणे, तळहात आणि तळपायांना खाज येणे, भूक कमी लागणे किंवा मळमळणे इत्यादी दिसून येऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here