वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

186
वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

🖋️ मिडियावार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

मूल : 19 सप्टेंबर
बकर्‍या चराईसाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात 50 वर्षीय गुराख्याचा मृत्यू झाला. ही घटना काटवन जंगलातील कक्ष क्रमांक 756 मध्ये गुरूवार, 19 सप्टेंबररोजी सायंकाळी 4.30 वाजता घडली. देवाजी वारलू राऊत असे मृतकाचे नाव असून, तो चिरोली येथील रहिवासी आहे.
नेहमीप्रमाणे मृतक बकर्‍या चराईसाठी जंगल शिवारात गेला होता. दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही बाब लगतच्या गुराख्यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. लागलीच याबाबतची माहिती ग्रामस्थांनी दिली. गावकर्‍यांनी याची माहिती वनविभागाला दिली.माहिती मिळताच गावकरी व वनविभागाच्या चमुने घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेत उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविला.
घटनास्थळी वनपरीक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, क्षेत्र अधिकारी गजानन वरगंटीवार, वनरक्षक परचाके, बुरांडे यांनी भेट देवून पाहणी केली. वाघ, बिबट यांच्या बंदोबस्तासाठी तात्काळ या परिसरात कॅमेरे लावण्यात आले. मृतकाच्या पश्चात पत्नी आणि मुले आहेत.