प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी समुद्रपूर :- तालुक्यातील जाम चौरस्ता येथे चोरट्यांनी श्रीस्वामी समर्थ डेली निड्स या दुकानात चोरी करून ३४ हजार रुपये लंपास केले आहे . ही घटना शनिवार सकाळच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार ,२२ जानेवारीला रात्रीच्या सुमारास जाम येथे शिवम कारमोरे यांच्या श्रीस्वामी समर्थ डेली निड्स या दुकानाचे कुलूप काढून दुकानात प्रवेश करून दुकानात असलेले ३४ हजार रुपये नगद कागदपत्रे अस्ताव्यस्त करून बॅक ऑफ इंडियाचे एटीएम चोरून पसार झाले . यावेळी चोरट्यांनी दुकानात असलेल्या सर्व बॉक्स उघडून पाहिजे विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी केल्यानंतर दुकानाचे कुलूप जसेच्या तसे लावून ठेवले . सकाळी शिवम कारमोरे हे दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.यावेळी त्यांनी झालेल्या चोरी संबंधी समुद्रपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या परिसरात दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी व्यावसायिकांकडून करण्यात करण्यात येत आहे.